प्रतिनिधी / सांगली
मिरज तालुक्यातील बुधगाव येथे बुधवारी सकाळी एका तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. सकाळी अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान माळ भागावरील बस स्टॉप नजीक हा हल्ला झाला. हल्लेखोराने तरुणाच्या तोंडावर वार केला. यात रफिक नामक तरुण गंभीर जखमी झाला असून हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढला.
यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अजून नोंद झालेली नाही. हल्ल्याचे कारण आणि हल्लेखोर कोण हे समजू शकले नाही हल्ला करणारी व्यक्ती बुधगाव मधीलच असल्याचे लोकांच्याकडून सांगण्यात आले.