22-6-2022 ते 28-6-2022 पर्यंत
ऋणानुबंधाच्या गाठी पितृऋण पितृदोष आणि बरंच काही. . ., (भाग-4 ः ऋणांचे प्रकार आणि परतफेड)
4. संबंधी ऋण- पूर्वजन्मात आपल्याच सग्यासोयरांना जर धोका दिला असेल, कुणाच्या घराला आग लावली असेल, घर होताना आडकाठी आणली असेल तर हे ऋण भोगावे लागते. याचे लक्षण म्हणजे व्यक्ती उच्च पदावर पोहोचते, मान सन्मान मिळतो, स्वकष्टाने धनार्जन करते, वैरींवरती मात करते आणि अचानक फासा ा़फिरतो. संकटावर संकटे येतात. संततीला अपार कष्ट होतात. एक डोळा बिघडतो, शरीरात रक्ताची कमी होते. अत्याधिक राग येतो. यावर उपाय म्हणजे परिवारातील सगळय़ांकडून समान पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये दान करणे.
5. बहिणीचे किंवा मुलीचे ऋण- मागील जन्मी बहिणीवर अन्याय केला असेल, तिची संपत्ती हरण केली असेल, तिच्या विवाहात अडथळे आणले असतील किंवा स्त्री भ्रूण हत्या केली असेल तर हे ऋण लागू होते. कुबेरासारखी संपत्ती असलेला माणूस एकाएकी कंगाल होतो. विशेषतः संततीच्या जन्मानंतर हे घडते. याची लक्षणे म्हणजे दातांचा क्षय होणे. पौरुषत्व नाहीसे होणे. वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होणे. यावर उपाय म्हणजे अनाथ मुलीच्या विवाहाला सर्वतोपरी मदत करणे, लहान मुलींच्या शिक्षणाचा आणि खाण्यापिण्याच्या खर्च उचलणे, घरातील प्रत्येक सदस्याकडून समान रक्कम घेऊन पिवळय़ा कवडय़ा खरेदी करणे आणि त्या जाळून पूर्ण राख करणे आणि ती राख वाहत्या पाण्यात विसर्जित करणे.
6. ब्रह्म ऋण किंवा बृहस्पतीचे ऋण- आपल्या घरचे पौरोहित्य करणाऱया गुरुजींवर अन्याय करणे त्यांचा हक्क मारणे. अकारण त्रास देणे याने हे ऋण उत्पन्न होते. यामध्ये शिक्षण अर्धवट राहते. याचे आणखी एक कारण म्हणजे वड, पिंपळ, औदुंबरसारख्या पवित्र झाडांची कत्तल करणे. याचे प्रमुख लक्षण म्हणजे ज्या व्यक्तीवर हे ऋण आहे त्या व्यक्तीसंबंधी खोटय़ा अफवा पसरवल्या जातात. खोटय़ा केसमध्ये व्यक्तीला अडकवले जाते आणि काही प्रसंगी तुरुंगवासही घडतो. यावर उपाय म्हणजे पौरोहित्य करणाऱया गुरुजींना सर्वतोपरी मदत करणे, मंदिर किंवा धर्मस्थळ निर्माण करण्याकरता आर्थिक मदत करणे, चारित्र्य शुद्ध ठेवणे.
7 निर्दयी ऋण-याचे कारण म्हणजे पूर्व जन्मी एखाद्याची हत्या करणे किंवा जमीन हडपणे, एखाद्याचे घर घेऊन मूल्य न देणे. याची सामान्य लक्षणे म्हणजे घरात राहणाऱया लोकांना घरी राहू नये असे वाटणे, एखाद्या विहिरीवरती (विहीर बुजवून) घर बांधणे, अंगावरचे, विशेषतः पापण्यांचे आणि भुवयांचे केस झडणे. यामुळे घरात अपघात होणे, एखादी व्यक्ती अपंग होणे असे होते. यावर उपाय म्हणजे परिवारातील प्रत्येक सदस्याकडून समान रक्कम घेऊन लोखंडाचे दान करणे, बांधकाम मजुरांना 43 दिवस जेवण घालणे, कावळय़ांना खाणे घालणे.
महा उपायः कार्यसिद्धीसाठी-एखादे अत्यंत महत्त्वाचे काम असते. अशावेळी ते काम करण्यासाठी बाहेर पडताना सात काळय़ा मिरचीचे गाणे मुख्य दरवाजाच्या उंबऱयावर ठेवून त्यावर पाय ठेवून बाहेर पडावे व नंतर परतून पाहू नये.
सोपी वास्तु टीपः बरेच जण घरात धातूचे कासव ठेवतात पण कसे ठेवावे हे माहीत नसते. कासवाचे तोंड पूर्वेकडे आणि शेपूट उत्तरेकडे असावी.
मेष
खर्च वाढल्यामुळे चिंता वाटू शकते पण त्याचबरोबर लक्ष्मीप्राप्तीचे चांगले योग बनत आहेत. लांबून चांगली खबर मिळू शकते. मनात वाईट विचार येऊ देऊ नका. दागदागिने खरेदी करण्याचे योग आहेत. पराक्रमाला झळाळी मिळेल. वैवाहिक जीवनात आनंददायक घटना घडतील. वाहन चालवताना अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. उपाय- दक्षिणमुखी हनुमानाचे दर्शन घ्यावे.
वृषभ
जमिनीसंबंधी काही व्यवहार अडकले असतील तर ते पूर्ण करण्याची योग्य वेळ आहे. वाहनसुख उत्तम मिळेल. नोकरीमध्ये आशादायक घटना घडतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवादाचे प्रसंग येतील. धर्मविषयक आस्था वाढेल. प्रवासाचे योग आहेत. लाभाचे प्रसंग येतील. मित्रांचा सहयोग लाभेल. उपाय- मोहरीच्या तेलाचे दान करावे.
मिथुन
आत्मविश्वासाची कमी जाणवू देऊ नका. दुसऱयांच्याबाबतीत मत व्यक्त करत असताना सावध रहा. जवळची व्यक्ती चहाडी करू शकते. प्रवासातून लाभाचे योग आहेत. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरीमध्ये वरि÷ांचा त्रास संभवतो. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. मानसन्मान प्राप्त होईल. दिखावा करणाऱया मित्रांपासून दूर रहावे.
उपाय- निळे फूल गटारीत टाकावे.
कर्क
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रतिकारशक्ती कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. डोळय़ांचे दुखणे येऊ शकते. भागीदारीतून फायदा होईल. नोकरदार वर्गाला विशेष लाभाचे योग बनत आहेत. धनप्राप्ती उत्तम असेल. वैवाहिक जोडीदाराबरोबर आनंदाने वेळ घालवाल. भाग्याची उत्तम साथ आहे. लांबचा प्रवास टाळावा.
उपाय -हिरव्या शाईने डाव्या मनगटावर 369 नंबर लिहावा.
सिंह
इच्छित वस्तूची प्राप्ती होईल. विवाहोत्सुक व्यक्तींसाठी अनुकूल काळ आहे. प्रवासातून आर्थिक लाभ संभवतो. जमिनीचे व्यवहार करू नयेत. आईविषयक चिंता वाटेल. छोटय़ा गुंतवणुकीतून लाभाची शक्मयता आहे. प्रेमप्रसंगात यश मिळेल. नोकरदार वर्गाच्या कामाचे कौतुक होईल. गुप्त शत्रू वाढतील. मित्रांकडून फसवणूक होऊ शकते.
उपाय-गरजूला काळी छत्री दान द्यावी.
कन्या
धनप्राप्ती समाधानकारक राहील. गुंतवणुकीतून मिळालेले पैसे ठेवी म्हणून जतन कराल. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. प्रवासात धोका संभवतो. जमिनीतील व्यवहारात यश प्राप्त होईल. शेअर्ससारख्या गुंतवणुकीतून लाभाचे प्रसंग येतील. संततीकडून चांगली बातमी कळेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. मंगल कार्या करिता खर्च होईल. उपाय- केशराचा टिळा माथी लावावा
तूळ
नोकरदार वर्गासाठी येणारा काळ हा प्रगतीचा असणार आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. शारीरिक व्याधी दूर होतील. धनसंचय मात्र कष्टाने संभवतो. कुटुंबातील वातावरणाचा समतोल राखण्याकरता प्रयत्न करावा लागेल. प्रवासातून अर्थार्जन होईल. लाभाचे प्रमाण अधिक असेल. मित्रांसोबत आनंदाने वेळ घालवाल. वडिलांच्या तब्येतीची चिंता वाटू शकते.
उपाय- देवीला कुंकूमार्चन करावे.
वृश्चिक
येणारा काळ हा सावधपूर्वक तब्येतीची काळजी घेण्याकरता वापरावा. धनार्जन उत्तम असेल. कुटुंबात सहयोगाचे वातावरण असेल. प्रवासाचे अनेक योग आहेत. धाकटय़ा बहीणभावंडाकडून फायदा होईल. छोटय़ा गुंतवणुकीतून लाभ संभवतो. संततीसुख उत्तम असेल. नोकरदार वर्गाला सावध राहण्याची गरज आहे. जोडीदाराशी वाद घडतील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
उपाय-कोळसे पाण्यात प्रवाहीत करावे.
धनु
पैसे मिळाल्याने आणि धनसंचय झाल्याने आनंदी असाल. तब्येतीचा पाया उत्तम राहील पण कुपथ्य करणे टाळावे. प्रवासात नुकसान होऊ शकते त्यामुळे प्रवास टाळावा. जमिनीच्या व्यवहाराला गती येईल. शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका. प्रेमसंबंधात ताणतणाव संभवतो. नोकरीत अप्रिय प्रसंग घडेल. वैवाहिक जीवनात चढ-उतार असतील. उपाय ः बत्तासे दान द्यावे
मकर
काही व्यावहारिक चिंता सतावू शकतात. आरोग्य उत्तम असेल. धनप्राप्ती कष्टाने होईल. प्रवास घडेल. नोकरदारांनी कोणतेही काम करत असताना विचारपूर्वक करावे. वरि÷ांची मर्जी राखावी. संततीच्याबाबतीत चिंता वाटू शकते. वैवाहिक जीवनामध्ये तडजोड करावी लागेल. वारसा हक्काकरता प्रयत्न करत असाल तर अनुकूल वेळ आहे.
उपाय ः तांब्याचे नाणे पाण्यात टाकावे.
कुंभ
कौटुंबिक वातावरणामध्ये आनंद असेल. पाहुण्यांचे आगमन संभवते. पैशांच्या बाबतीत भाग्यवान असाल. सही करताना सावध रहावे. रागाच्या भरात मेसेज किंवा ई-मेल करू नये. उधारी देणे आणि घेणे यातून नुकसान संभवते. जमिनीचे व्यवहार शक्मयतो पुढे ढकला. कामाच्या ठिकाणी व्यग्रता वाढेल. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. उपायः चपातीला मोहरीचे तेल लावून कुत्र्याला खाऊ घालावी.
मीन
जुने मित्र किंवा मैत्रिणी भेटल्याने आनंद होईल. सरकारी कामांमध्ये यश मिळेल. घरातील आणि बाहेरील कामे पूर्ण करण्यामध्ये व्यस्त असाल. आरोग्य उत्तम असेल. नोकरदार वर्गाला शाबासकी मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होतील असे प्रसंग टाळावेत. अचानक धनप्राप्तीचे योग आहेत. मानसन्मान मिळेल. उत्तम लाभ होतील. उपाय ः जलचरांना भाताची शिते घालावीत.