तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूरचे माजी आमदार युन्नूसभाई शेख यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. कालच त्यांना सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
१९६९, १९७५ आणि १९८५ साली तीन वेळा ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. १९७५ शरद पवार सोलापूरचे पालकमंत्री असताना युनूस भाई शेख यांना त्यांनी निवडून आणून महापौर केले .स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. १९९२- १९९७ झाली ते विधान परिषदेवर निवडून गेले मात्र त्यानंतर सुभाष देशमुख यांच्याकडून ते पराभूत झाले. त्यांच्या पश्चात चार मुले तीन मुली असा परिवार आहे