सांगली/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाला बुधवारपासून प्रारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत विकास महाआघाडी शासन आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांची लोकांना माहिती दिली जात आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा ज्योती आदाटे यांनी या उपक्रमांतर्गत संजय गांधी निराधार योजनेची लोकांना माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.