वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2021 राष्ट्रीय मुष्टियुद्ध हंगामाला रविवार दि. 18 जुलैपासून प्रारंभ होत आहे. कोरोना महामारी समस्येमुळे तब्बल किमान वर्षभराच्या कालावधीत सर्व राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. आता 18 ते 23 जुलै दरम्यान युवा पुरूष आणि महिलांची राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धा घेतली जाणार आहे.
त्याचप्रमाणे कनिष्ठ मुलांची तिसरी राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धा आणि कनिष्ठ मुलींची चौथी राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धा 26 ते 31 जुलै दरम्यान घेतली जाईल, अशी घोषणा शनिवारी अखिल भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे. रविवारपासून सुरू होणाऱया राष्ट्रीय युवा आणि कनिष्ठांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत 34 राज्यांचे स्पर्धक सहभागी होणार आहेत.