प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रविवारी विजयादशमी दसरा उत्सव साजरा करण्यात आला. लिंगराज कॉलेजच्या मैदानात हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर डॉ. एच. बी. राजशेखर, रामचंद्र येडके उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. उपस्थित स्वयंसेवकांनी ध्वजाला वंदन केले.
शहर परिसरातील लिंगराज मैदान, अनगोळ येथील संत मीरा स्कूल व महांतेशनगर महांत भवन अशा तीन ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजया दशमी साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित स्वयंसेवकांनी दंड प्रदर्शन व यष्टी प्रदर्शन केले. प्रारंभी लिंगराज कॉलेजच्या मैदानात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व शस्त्रपूजन झाले.
यावेळी संघाचे बौद्धिक विभाग प्रमुख रामचंद येडके म्हणाले, या दिवशी भगवान श्री रामाने रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळविला होता.
स्वयंसेवकांना बौद्धिक मार्गदर्शन
प्रभू श्रीरामाच्या या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. असे सांगून स्वयंसेवकांना बौद्धिक मार्गदर्शन केले. तसेच डॉ. एच. बी. राजशेखर यांनी विजया दशमीदिवशी शस्त्रांचे पूजन का केले जाते, यावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी अक्षय कुलकर्णी, श्री काळे, आनंद बुक्कीबाळ, गौरव कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, संजय रणसुभे, शिव नरोटे, प्रणव गाडगीळ, आप्पय्या रामराव यासह स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.