वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रियलमीचा न्यू रियलमी-6 या स्मार्टफोनची पहिली विक्री आजपासून सुरू होत आहे. या स्मार्टफोनमध्ये तीन रॅम आणि दोन स्टोरेजची सुविधा असणारे मॉडेल सादर केले आहेत. कमी वेळेत बॅटरी फुल्ल होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. दोन रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
किमती आणि फिचर
फोनची विक्री दुपारी 12 वाजता कंपनीच्या कार्यालयीन वेबसाईटवर आणि फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. रियलमी-6 हा स्मार्टफोन खरेदी करताना आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना क्रेडिट आणि डेबिट कार्डवर इएमआयवर 750 रुपयाची सवलत देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तर फ्लिपकार्ट ऍक्सिस बँकेचे क्रडिट कार्डवरती 5 टक्क्यांपर्यंतचे कॅशबॅक मिळणार असल्याचे म्हटले आहे.
मॉडेल किंमत रुपयात
4 जीबी 64 जीबी 12,999
6 जीबी 128 जीबी 14,999
8 जीबी 128 जीबी 15,999