ऑनलाईन टीम / मुंबई :
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातल्या ड्रग्ज कनेक्शनमुळे अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होताना दिसत आहे. रिया चक्रवर्ती न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
आज रिया आणि शौविक यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनसीबी ने पुन्हा एकदा जामीन देण्याबाबत विरोध दर्शवला. त्यांनी आरोप केला की, शौविक चक्रवर्ती ने रीयाच्या सांगण्यावरून सुशांत सिंह राजपूतसाठी ड्रग्ज विकत घेतले आणि त्याची व्यवस्था केली आहे.
दरम्यान, मागील सुनावणीमध्ये विशेष न्यायालयाने 6 ऑक्टोबर पर्यंत वाढ केली होती. यापूर्वी रीया आणि तिचा भाऊ शैविक याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याआधी दोन वेळा तिचा जमीन अर्ज फेटाळला आहे.
या प्रकरणात रिया दोषी आढळल्यास तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते