प्रतिनिधी / बेळगाव
पंत बाळेकुंद्री येथील करुणाकर शेट्टी व युनूस हिरेकुडी यांच्यावतीने कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. याप्रसंगी मलगौडा पाटील, मल्लिकार्जुन हेगनायक, सुरेश नावी, प्रमोद चंदरगी, मधू उचगावकर आदी उपस्थित होते.