मुंबई
नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपले नवे रुपे कार्ड नुकतेच जारी केले असून या कार्डवर आता ग्राहकांना ऑफलाइनही पैशाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार करता येणार असल्याचे समजते. ही सुविधा इंटरनेटची सुविधा नसलेल्या भागाकरीता अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. म्हणजेच या रुपे कार्डाच्या माध्यमातून इंटरनेट नसले तरी ऑफलाइन माध्यमातून पैशाचा व्यवहार करता येणार आहे. कार्डधारकांना इंटरनेट पुरेसे नसलेल्या भागात पीओएसवर संपर्काविना ऑफलाइन पैसे देणे शक्य होणार आहे. संपर्कहिन राहून व्यवहार करता येणार आहे.