मुंबई
स्कोडा ऑटो इंडियाने आपली नवी कोरी रॅपिड रायडर प्लस ही मोटारगाडी बुधवारी भारतीय बाजारात उतरवली आहे. बीएस-6 श्रेणीवर आधारित या कारची किंमत 7.99 लाख रुपये असणार आहे. ही रॅपिड रायडर कार 110 पीएसची ऊर्जा देणारी एक लिटर पेट्रोल इंजिनसह विक्रीसाठी उपलब्ध असेल. उत्तम अंतर्गत-बाह्य रचना, सुरक्षेच्या उत्तम सुविधा या कारमध्ये असतील. या गाडीचे वैशिष्टय़ म्हणजे पूर्वीच्या गाडय़ांच्या तुलनेत ही नवी गाडी 23 टक्के अधिक मायलेज देते. यात डय़ुअल एअरबॅग्स, अँटीलॉक ब्रेकींग सिस्टम, रिअर पार्किंग सेन्सर्स अशाही सुविधा असतील.