वार्ताहर / कसबा बावडा
रस्त्यावरन सुसाट फिरणारे वहानाना शहर वहातूक शाखेचा ब्रेक लागला. शेकडो वहाने थेट जप्त करून ताब्यात घेतली काल सायंकाळपासुन रोडवरून ये जा करणाऱ्या मोकाट वहाने जप्त करण्यात आली होती परतू आज सकाळपासुन शहर वहातूक शाखेचा मोठा फौजफाठा बावडयात सज्ज झाला. त्यांनी रोडवर ये जा करणारी दुचाकी वहानधारकांची चौकशी करून विनाकारण कारण आलेली वहाने जप्त करण्याची कार्यवाही सुरु केली. ही कार्यवाही ११ वाजेपर्यंत सुरु होती या कार्यवाहीत शेकडो वहाने जप्त केली आहेत. दरम्यान तीन दिवस लॉकडॉऊन नतंर नागरीकांना जिवनावश्यक वस्तू खरेदी साठी सकाळी ७ ते१२ वेळ दिली होती परंतू नागरीकांनी खरेदीच्या नावाखाली सर्व प्रशासकीय नियमाची पायमलली केली त्यानतंरही नागरीक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने पोलीस प्रशासनाला याची नोंद घ्यावी लागली.
दुपारी बारा नतंर संपूर्ण व्यवहार बंद करण्यात येऊन मोटरसायकल सर्व गावातून नियमांचे पालन करण्याबाबत स्पिकर वरुन वारंवार सुचना देत होते. सायंकाळी भगवा चौक ते शुगर मिल कॉर्नर संपूर्ण रोडवरील दिवे बदं ठेवण्यात आले होते त्यामुळे शुकशुकाट होता . मराठा कॉलनी आध्याप लॉकडाऊन असुन सर्व परिसरात सन्नाटा आहे. आजच्या पोलीस कार्यवाहीने वहान धारकांनी चागला धसका घेतता आहे. तसेच सध्या शेतीची कामे वेगात सुरु आहेत. शेलकऱ्याला दुचाकी वहानावरुनच शेता कडे येजा करावी लागते तरी प्रशासनाने या कार्यवाहीतून शेतकरी वहानधारकाना वगळावे अशी मागणी होत आहे.