प्रतिनिधी / बेळगाव
जागतिक पर्यावरणाच्या निमित्ताने बागायत खात्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रोप बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. क्लब रोडवरील हय़ुमपार्क येथे भरलेला हा बाजार दि. 7 जूनपर्यंत सुरू राहणार आहे.
या बाजारामध्ये उत्तम प्रतिची आंब्याची, चिकू, कडुलिंब, जासवंद, गुलाबाची, विविध फुलांची आणि अन्य औषधी वनस्पतींची रोपे माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शेतकरी, वनप्रेमी व पुष्पप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी हा बाजार आयोजित करण्यात आल्याचे बागायत खात्याचे उपसंचालक किरणकुमार उपाळे यांनी सांगितले.
बेळगाव जिल्हय़ात एकूण 28 बागायत क्षेत्रे आहेत. यापैकी 9 ठिकाणी रोप वाटिका चालविली जाते. दरवषी मोठय़ा प्रमाणात खास समारंभ आयोजित करून या बाजाराचे उद्घाटन केले जाते. मात्र यंदा लॉकडाऊनच्या नियमामुळे सामाजिक अंतर राखणे आवश्यक असल्याने सर्व नियम पाळून हा बाजार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. संध्याकाळपर्यंत 3 हजाराहून अधिक रोपे विक्री केल्याची माहिती त्यांनी दिली.