व्हॅलेंटाईन डे येत असल्याने फेब्रुवारीचा महिना जगभरात रोमान्स (उत्कट प्रेम) चा महिना माना जातो. पण चित्रपटजगतात फेब्रुवारीचा महिना मर्डर मिस्ट्री आणि थ्रिलरच्या नावावर होणार आहे. फेब्रुवारीत अनेक बहुप्रतीक्षित वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत.
लाहौर कॉन्फिडेंशियल
4 फेब्रुवारी रोजी जी5 ओरिजिनल फिल्मचा लाहौर कॉन्फिडेंशियल प्रदर्शित झाला आहे. हा एक स्पाय लव्ह स्टोरी असुन यात ऋचा चड्ढा, करिश्मा तन्ना आणि अरुणोदय सिंग मुख्य भूमिकेत आहे. लाहौर कॉन्फिडेंशियलची कहाणी दोन देशांच्या हस्तकांमधील प्रेम आणि कर्तव्यभावनेवर आधारित आहे.
द फॅमिली मॅन 2
12 फेब्रुवारी राजी अमेझॉन प्राइमची बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित वेब सीरिज द फॅमिली मीनचा दुसरा सीझन येणार आहे. पण काही वृत्तांनुसार तांडववरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर याचे प्रदर्शन लांबणीवर पडू शकते.
लव्ह स्कँडल अँड डॉक्टर्स
5 फेब्रुवारी रोजी अल्ट बालाजी आणि जी5 वर एलएसडी-लव्ह स्कँडल अँड डॉक्टर्स वेबसीरिज येणार आहे. ओटीटीच्या जगात हा पहिला मेडिकल थ्रिलर असल्याचा दावा करण्यात येत आहे.
क्रॅश
14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन दिनी जी5 वर क्रॅश सीरिज प्रदर्शित होणार आहे. यात चार भावाबहिणींची गोष्ट गुंफण्यात आली आहे. अनुष्का सेन, अदिती शर्मा आणि रोहन मेहरा मुख्य भूमिकेत आहेत. सीरिजची निर्मिती एकता कपूरने केली आहे.
लाइव्ह टेलिकास्ट
12 फेब्रुवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाइव्ह टेलिकास्ट वेबसीरिज स्ट्रीम होणार आहे. या हॉररपटात काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत असून हा भूतावर आधारित असल्याचे समजते.
गर्ल ऑन द ट्रेन
26 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर परिणीति चोप्राचा गर्ल ऑन द ट्रेन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यात मर्डर मिस्ट्री आणि थ्रिलरची मजेशीर मात्रा दिसून येणार आहे.