रोशनी लिए फिरते है चुल्हा घर का जलाने के लिए
हर्ष गोयंका यांनी शेअर केले छायाचित्र
प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असतात. त्यांचे बहुतांश पोस्ट रंजक आणि मजेशीर असतात. पण त्यांनी ट्विटरवर अलिकडेच शेअर केलेले छायाचित्र लोकांना भावुक करणारे आहे. हे छायाचित्र एका वरातीतील असून यात एक आई मजुरीसाठी डोक्यावर इलेक्ट्रीक दिवा ठेवून नवऱयाच्या घोडय़ामागून चालत असल्याचे दर्शविणारे आहे. तसेच या आईने स्वतःच्या निष्पाप मुलाला कापडी झोळी बांधून खांद्याला लटकवून ठेवले आहे. हे छायाचित्र पाहून लोक या आईची हिंमत आणि निर्धाराला सलाम ठोकत आहेत.
या छायाचित्राला आतापर्यंत 11 हजारांहून अधिक लाइक्स आणि 1300 हून री-ट्विट मिळाले आहेत. तसेच हे छायाचित्र सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येत आहे. या छायाचित्रावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत असून त्या मातेचे कौतुक केले जात आहे.