सारेगमप लिटिल चॅम्पमधून घराघरामध्ये पोहचलेला मराठमोळा गायक रोहित राऊत नुकताच विवाहबंधात अडकला. रोहितने त्याची गर्लप्रेंड गायिका जुईली जोगळेकरशी लग्न केले. पुण्यातील ढेपेवाडय़ामध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडला. रोहित आणि जुईली यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांच्याही चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
रोहित आणि जुईली गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. बऱयाचदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. अखेर दोघे विवाहबंधनात अडकले. दोघांच्याही घरी लग्न सोहळ्याची जोरदार तयारी सुरु होती. त्यांच्या साखरपुडा, संगीत, महेंदी आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नासाठी रोहित आणि जुईली यांनी खास मराठमोळा लूक केला होता, ढेपेवाडय़ाची फुलांनी केलेली सजावट लक्ष वेधून घेणारी होती. गुलाबी रंगाच्या साडीत जुईली खूपच सुंदर दिसत होती तर रोहितनेही गुलाबी सलवारकुर्ता घातला होता. दुनियादारी सिनेमातील गाण्यांनी रोहितला स्टार केले तर रिऍलिटी शोही त्याने गाजवले आहेत. एका शोमध्ये या दोघांची मैत्री झाली होती.