वृत्तसंस्था/ ढाक्का
रविवारी येथे बांगलादेश आणि लंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याला प्रारंभ होण्यापूर्वी लंकन संघाकातील तीन सदस्य कोरोना बाधित असल्याचे सांगण्यात आले.
लंका आणि बांगलादेश यांच्यातील ही वनडे मालिका सुरू झाली असून दुसरा वनडे सामना 25 आणि तिसरा वनडे सामना 28 मे रोजी खेळविला जाणार आहे. लंकन पथकातील दोन खेळाडू आणि प्रशिक्षकाची कोरोना चाचणी घेण्यात आली असून ते या चाचणी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. इसुरु उदाना व शिरान फर्नांडो हे खेळाडू आणि गोलंदाज प्रशिक्षक चमिंडा वास हे तीनजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या घटनेमुळे आता उभय संघातील पहिला सामना रद्द न करताना तो खेळविला जाईल, असे बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.