वृत्तसंस्था/ कोलंबो
तिसऱया लंका प्रीमियर लीग टी-20 स्पर्धेला 31 जुलैपासून प्रारंभ होणार असल्याची घोषणा क्रिकेट लंकाने केली. सदर स्पर्धा 21 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत एकूण 24 सामने खेळविले जातील.
लंकेतील ही राष्ट्रीय स्तरावरील सर्वात आघाडीची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत एकूण पाच संघांचा समावेश राहील. स्पर्धेतील सुरूवातीचे काही सामने कोलंबोमध्ये खेळविले जातील. त्यानंतर या स्पर्धेतील उर्वरित सामने हंबनटोटा येथे होणार आहेत. 2021 लंका प्रिमियर लीग स्पर्धेचे विजेतेपद जाफना किंग्ज संघाने पटकावले होते. त्यावेळी जाफना किंग्जने अंतिम सामन्यात गॅले ग्लॅडिएटर्सचा 23 धावांनी पराभव करून विजेतेपद मिळविले होते. अविष्का फर्नांडोला मालिकावीर तसेच सामनावीर असे दोन्ही पुरस्कार देण्यात आले होते.