वृत्तसंस्था/ ढाका
लंकेचा क्रिकेट संघ मे महिन्यात बांगलादेशच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयामध्ये यजमान बांगलादेश व लंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे.
उभय संघातील पहिली कसोटी चितगाँगमध्ये 15 मे पासून सुरू होईल. तर दुसरी आणि शेवटची कसोटी ढाक्मयामध्ये 23 मे पासून खेळविली जाईल. दोन सामन्यांची ही कसोटी मालिका आयसीसीच्या विश्व कसोटी चषक चॅम्पियनशीप अंतर्गत राहील. विश्व कसोटी चॅम्पियनशीप मानांकनात सध्या लंका पाचव्या तर बांगलादेश आठव्या स्थानावर आहे. लंकेचा संघ 2021 नंतर दुसऱयांदा बांगलादेशचा दौरा करत आहे. 2021 च्या मालिकेत उभय संघात झालेल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत बांगलादेशने लंकेचा 2-1 असा पराभव केला होता.