मुंबई –
सध्या बाजारात आयपीआंsचा धमाका मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. यामध्ये विविध कंपन्या आपल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आयपीओ आणण्याचा हा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सध्या स्पेशालिटी केमिकल्स कंपनी लक्ष्मी ऑर्गेनिक्स आणि प्रीसिजन इंजिनिअरिंग सॉल्यूशन्स कंपनी एमटीएआर टेक्नालॉजीस यांच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगला (आयपीओ) बाजार रेग्युलेटर सेबी यांच्याकडून मंजुरी देण्यात आली आहे. फायलिंगमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार लक्ष्मी ऑर्गेनिक्स आयपीओच्या आधारे 800 कोटी रुपये आणि एमटीएआर टेक्नालॉजी 650 कोटी रुपये उभारणार असल्याची माहिती आहे. दोन्ही कंपन्यांचे आयपीओ चालू मार्चमध्ये सुरु होण्याचे संकेत आहेत. मुंबईची स्पेशलिटी केमिकल्स कंपनी लक्ष्मी ऑर्गेनिक्स आयपीओसाठी 500 कोटी रुपयाचा प्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल (ओएफएस) याच्या मदतीने कंपनीची प्रवर्तक येलो स्टोन ट्रस्ट 300 कोटीचे समभाग सादर करणार आहेत. यासोबतच हेरांबा इडस्ट्रीजचा आयपीओ 23 फेबुवारी रोजी खुला होणार आहे. या अगोदर केवळ अँकर गुंतवणूकदारांसाठी 22 फेब्रुवारीपासून खुला होणार असल्याची माहिती आहे. 625 कोटी रुपयासाठी हा आयपीओ कंपनी 60 कोटी रुपयाचे नवे समभाग सादर करणार असल्याचे संकेत आहेत. दुसऱया बाजूला ऑफर फॉर सेलच्या मदतीने प्रवर्तक 90.15 लाखाचे समभाग सादर करणार आहेत.