प्रतिनिधी/ सातारा
केंद्रशासनाने 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. लोकसंख्येचा विचार करता सातारा शहरात सदरबझार, दगडीशाळेमध्ये आणी शाहुपूरी ग्रामपंचायत इमारत या ठिकाणी नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्याबरोबरच जिल्हयातील नगरपालीका, नगरपंचायत आणी मोठया ग्रामपंचायतीच्या अधीकारक्षेत्रात नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्याचे जिल्हा प्रशासन आणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्तावीत केले आहे. लवकरच नागरीकांना सुकर होईल अशी लसीकरणाची व्य्वस्था केंद्र सरकारच्या माध्यमातुन करण्यात येईल अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
सध्या कोरोनाने जगभरासह, भारतामध्ये थैमान घातले आहे. सुदैवाने भारतीय बनावटीची लस उपलब्ध् झाली असून, सर्व प्रथम जानेवारी महिन्यात कोरोना प्रंटवॉरीअरर्स व त्यानंतर 45 आणी त्यावरील वयोगटातील व्यक्तींना लसीकरण करण्यास प्राधान्य् दिले होते. आता केंद्राने 1 मे, महाराष्ट्र आणी कामगार दिनापासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीकरण करावयाची असलेली लोकसंख्या विचारात घेवून, लसीकरण केंद्र सुध्दा वाढवावी लागणार आहेत. संपूर्ण जिल्हयातील नगरपालीका, नगरपंचायती, मोठया ग्रामपंचायती इ. ठिकाणी नागरीक-ग्रामस्थ यांच्या सोयीसाठी नव्याने लसीकरण केंद्रं सुरु करणेबाबत,जिल्हाप्रशासन आणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्तावीत केले आहे.
सातारा शहरात सुरुवातीपासूनच नगरपालीकेच्या माध्यमातुन, पूज्य कस्तुरबा आरोग्य केंद्र आणी गोडोली येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज उर्फ दादामहाराज आरोग्य केंद्रामध्ये सातारा शहर आणी आसपासच्या उपनगरातील नागरीकांना दररोज सरासरी प्रत्येक केंद्रावर 300 व्यक्तींना मोफत लसदिली जात आहे. या केंद्रावर लसीकरण करुन घेण्यासाठी येणा-या नागरीकांची बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, तातडीच्या वैद्यकीय प्रथोमोपचाराची सोय आदी बाबींची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
लवकरच सातारा शहरातील सदरबझार येथील दगडी शाळा, आणी शाहुपूरी येथे ग्रामपंचायत इमारत या नवीन जादा ठिकाणांसह, संपूर्ण जिल्हयातील नगरपरिषदा, नगरपंचायती, मोठया ग्रामपंचायती येथे केंद्र सरकारच्या मंजूरीप्रमाणे नवीन लसीकरण केंद्र सुरु करुन, 18 वर्षावरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणाची सुलभ व्यवस्था करण्यात येईल असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.