नवी दिल्ली :
मुख्य कार्यालय गुरगाव येथे असणारी पुरवठा साखळी क्षेत्रात कार्यरत r डेलिवरीचा आयपीओ सादर करण्यात येणार असून याच्या अंतर्गत कंपनीला तब्बल 7,460 कोटी रुपयांची उभारणी करण्यासाठी नियामक सेबीकडून मंजुरी मिळालेली आहे. महिन्याच्या शेवटी सदरचा आयपीओ सादर केला जाण्याची शक्यता सांगितली जात आहे.
आयपीओच्या मदतीने 5,000 कोटी रुपयांचे ताजे इक्विटी समभाग सादर करण्यात येणार असून यामध्ये प्रवर्तकांचे 2460 कोटींचे समभाग असतील. ओएफएसच्या अंतर्गत कार्लाइल समूह आणि सॉफ्टबँकसोबत डेलिवरीचे सह संस्थापक लॉजिस्टिक कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी विक्री करणार आहे. कंपनीमध्ये सॉफ्टबँकेची 22.78 टक्के, कार्लाइल समूहाची 7.42 टक्के आणि चायना मोमेंटम फंड्सची हिस्सेदारी 1.11 टक्के आहे. आयपीओमधून मिळणाऱया रक्कमेचा वापर हा व्यवसायाचा विस्तार आणि अन्य बाबींसाठी करण्यात येणार असल्याचेही संकेत आहेत. कंपनी लॉजिस्टीक्स क्षेत्रात जोमाने काम करते आहे. एक्सप्रेस पुरवठा सेवासह अवजड मालाचा पुरवठा अशा पद्धतीने सेवा बजावत आहे.
डेलिवरीकडे 21342 ऍक्टिव्ह कस्टमर्स
ई कॉमर्स लॉजिस्टिक्स कंपनी डेलिवरी, एक अखिल भारतीय नेटवर्कचे संचलन करत आहे. तसेच 30जून 2021 पर्यंत कंपनी 17,045 पोस्टल इंडेक्स नंबर (पिन) कोडना सेवा देत आहे. तसेच 21342 ऍक्टिव्ह कस्टमर्सना सेवा देत आहे.