योगगुरू रामदेव बाबा यांची सरकारकडे मागणी : अतिजलद चौकशीचा आग्रह
वृत्तसंस्था/ हरिद्वार
हरियाणातील वल्लभगड येथे काही दिवसांपूर्वी निकिता तोमर या 21 वर्षीय हिंदू तरूणीचा मुस्लीम तरूणाने एकतर्फी प्रेमप्रकरणात खून केल्याचे प्रकरण गाजत आहे. या लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपींना जनतेसमोर फाशी देण्यात यावी, अशी मागणी योगगुरू बाबा रामदेव यांनी केली आहे. देशात इतरत्रही अनेक हिंदूंचे बळी लव्ह जिहाद प्रकरणांमध्ये गेले आहेत. अशा सर्व प्रकरणांची लवकरात लवकर चौकशी करून गुन्हेगारांना देहदंडाच्या शिक्षा देण्यात याव्यात अशी आग्रही मागणीही रामदेव यांनी संबंधित राज्य सरकारांकडे केली.
निकिता तोमर ही 21 वर्षीय तरुणी महाविद्यालयात जात असताना तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱया तौसीफ नामक युवकाने तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. तो या तरूणीने हाणून पाडल्यानंतर त्याने तिच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून तिचा निर्घृण खून केला. त्यानंतर त्याने पलायन केले. चोवीस तासांमध्ये त्याला पकडण्यात आले. त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली.
संतापाची लाट
या लव्ह जिहाद हत्या प्रकरणामुळे हरियाणा व इतर राज्यांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. समाजमाध्यमांवरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपी काँगेस नेत्याचा जवळचा नातेवाईक असल्याने राजकीय रंगही या प्रकरणाला प्राप्त झाला आहे. हरियाणा सरकारने हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविले जाईल, अशी घोषणा केली असून चौकशीसाठी विशेष दलाची स्थापना केली आहे.
सहा महिन्यांमध्ये तीन प्रकरणे
गेल्या सहा महिन्यांमध्ये दिल्ली आणि हरियाणात लव्ह जिहादची तीन हत्या प्रकरणे घडली आहेत. दोन हिंदू युवकांचा मुस्लीम तरूणींवर सहमतीतून पेम केल्याने तरूणींच्या नातेवाईकांकडून खून करण्यात आला होता. तर निकिता प्रकरणी एकतर्फी प्रेमातून या हिंदू तरूणीची हत्या करण्यात आली आहे.