बेंगळूर : कोरोना लसीकरणाला व्यापक स्वरुप देण्यासाठी योगदिनाचे औचित्य साधून लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली. सोमवारी एकाच दिवशी देशात विक्रमी लसीकरण झाले. दिवसभरात 84 लाखाहून अधिक डोस देण्यात आले. त्यानुसार या लसीकरण मोहिमेत बेंगळूर शहर जिल्हय़ाने देशात प्रथम क्रमांक मिळविला असून सोमवारी एका दिवसात 2 लाख 9 हजार 265 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर या पाठोपाठ इंदोरमध्ये 2 लाख 1 हजार 339 जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत झालेल्या लसीकरणातही बेंगळूर अग्रस्थानी असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
Previous Articleअधिवेशनासाठी नव्याने प्रक्रियेची पाळी
Next Article पुढील मुख्यमंत्र्याबाबत हायकमांडच निर्णय घेईल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.