म्हैसूर/प्रतिनिधी
म्हैसूर आरोग्य विभागाने कोविड -१९ लसचा पहिला डोस देणे बंद केले आहे. लस उपलब्ध नसल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. लस उपलब्ध झाल्यांनतर पुन्हा लसीकरण सुरु केलं जाणार आहे.
आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे पहिल्या डोसचे लसीकरण करणे सध्या थांबविण्यात आले आहे. एकदा ही लस उपलब्ध झाल्यावर ही मोहीम पुन्हा सुरू होईल.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक समस्या उद्भवत आहे. रुग्णसंख्या वाढीमुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. केंद्राकडून राज्यांना ऑक्सिजन पुरवठा केला जात असला तरी आवश्यक तितका ऑक्सिजन उपलब्ध होत नाही आहे. ऑक्सिजन अभावी बऱ्याच ठिकाणी रुग्णांचा मृत्य होत आहे. ऑक्सिजन बरोबरच राज्यात लसीची कमतरता भासत असून लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. कोरोनाचा धोका टाळायचा झाल्यास लवकरात लवकर लसीकरण होणे गरजेचे आहे.