दीर्घकाळ राहणार महामारी : डब्ल्यूएचओ
कारोना विषाणूच्या प्रकोपाला तोंड देणाऱया जगाला लस उपलब्ध झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने लसीवरून पुन्हा इशारा दिला आहे. ही लस कुठल्याही प्रकारे कोरोना विषाणूला क्षणार्धात नष्ट करणारी जादूची गोळी ठरणार नाही. सर्वांना वास्तववादी व्हावे लागणार आहे. जगात या महामारीचा प्रकोप दीर्घकाळापर्यंत राहणार असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. ही लस चांदीची गोळी नाही, जी नजीकच्या भविष्यात महामारीला समाप्त करेल. सुरक्षित आणि प्रभावी लसींचा विकास एक वेगळी बाब आहे. परंतु याचे पुरेशा प्रमाणात उत्पादन करणे आणि सर्वांपर्यंत ती पोहोचविणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया क्षेत्राच्या काही हिस्स्यांमध्ये सुरू होत आहे, परंतु समान वितरणात वेळ लागणार असल्याचे उद्गार डब्ल्यूएचओचे पश्चिम प्रशांत क्षेत्राचे संचालक कसेई ताकेशी यांनी काढले आहेत.
2 वर्षे लागणार : उच्चजोखीमयुक्त लोकांना वगळल्यास सर्वसामान्य नागरिकांना लस मिळण्यास 12 ते 24 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. तरुणवर्ग कोरोनाला नियंत्रित करणाऱया उपाययोजनांची अंमलबजावणी करत नसल्याचे चित्र आहे. सुटीदरम्यान त्यांच्याद्वारे संक्रमण फैलावण्याची शंका असल्याचे ते म्हणाले.
लक्षणेरहित लोक नाताळाच्या सुटीत स्वतःचे कुटुंबीय किंवा मित्रपरिवाराला संक्रमित करू शकतात असे ताकेई यांनी सांगितले आहे.