ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे महिन्यात दुसरे विधान : निष्कर्षांवरील शंका दूर होणे शक्य
ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेका कंपनीच्या कोरोना लसीचे दोन पूर्ण डोस अत्यंत उत्तम इम्यून प्रतिसाद देत आहेत. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने गुरुवारी रात्री यासंबंधी माहिती दिली आहे. यापूर्वी एक पूर्ण आणि एक अर्धा डोस देऊन परीक्षण केले होते. म्हणजेच स्वयंसेवकाला दीड डोस देण्यात आला होता. आता दोन पूर्ण डोस देण्यात आले असून त्याचा निष्कर्ष अत्यंत चांगला राहिल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.
दोन पूर्ण डोसच आवश्यक
ऑक्सफोर्डने गुरुवारी स्वतःच्या लसीसंबंधी नव्याने माहिती दिली आहे. स्वयंसेवकांना परीक्षणादरम्यान लसीचे दोन पूर्ण डोस देण्यात आले असून याचे चांगले निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. यापूर्वी एक पूर्ण आणि अर्धा डोस देण्यात आला होता. याच्या तुलनेत दोन पूर्ण डोस अत्यंत प्रभावी ठरल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच कंपनीने स्वतःच विविध निष्कर्षांची बाब मान्य केली होती. तेव्हा तज्ञांनी याच्या डाटा विश्लेषणावरही प्रश्न उपस्थित झाले होते. लसीच्या निष्कर्षांच्या पुष्टीसाठी अद्याप काम करण्याची गरज असल्याचेही ऑक्सफोर्डने मान्य केले आहे.
तीन टप्प्यांचा तपशील प्रसिद्ध
ऑक्सफोर्डने एका महिन्यात दुसऱयांदा 1 ते 3 टप्प्यातील परीक्षणाचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. दीड डोस देण्याचे परीक्षण पूर्वीपासून निश्चित नव्हते, असे ऑक्सफोर्डचे म्हणणे आहे. विद्यापीठाचा आता भर लसीचे पूर्ण दोन डोस देण्यावरच आहे. दीड आणि दोन डोसचा प्रयोग करणे आमच्या रणनीतिचा हिस्सा होता. यावर यापूर्वीच प्रश्न उपस्थित झाले आहेत, कारण डोसमधील अंतरामुळे निष्कर्षांमध्ये अंतर येणेही स्वाभाविक असल्याचे ऑक्सफोर्डकडून सांगण्यात आले आहे. बूस्टर डोस देण्यात आल्यावर जे निष्कर्ष मिळाले त्यातून एक डोसच्या तुलनेत अँटीबॉडी वेगाने निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्टँडर्ड डोसचा वापरच केला जावा, असे विद्यापीठाकडून म्हटले गेले आहे.
यापूर्वी प्रश्नचिन्ह ऑक्सफोर्ड तसेच एस्ट्राजेनेकाने 23 नोव्हेंबर रोजी ब्रिटन आणि ब्राझीलमध्ये करण्यात आलेल्या परीक्षणात लस अत्यंत प्रभावी ठरल्याचे जाहीर केले होते. अर्धा डोस देण्यात आल्यावर लस 90 टक्क्यांपर्यंत प्रभावोत्पादक आढळून आली होती. यानंतर दुसऱया महिन्यात पूर्ण डोस देण्यात आल्यावर 62 टक्के प्रभावोत्पादकता दिसून आली होती. त्याच्या एक महिन्यांनी दोन पूर्ण डोस दिले असता लसीची प्रभावोत्पादकता 70 टक्के आढळून आली. भारतात ही लस पुण्यातील सीरम इन्स्टीटय़ूट ऑफ इंडियाकडून तयार केली जात आहे. सीरमने भारतातील नियामकीय यंत्रणेकडे या लसीच्या आपत्कालीन वापराची अनुमती मागितली आहे.