प्रतिनिधी / लांजा
लांजा शहरातील चेतन बाळकृष्ण कोतवडेकर (28, रोहिदासवाडी) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी 10. 45 च्या दरम्यान उघडकीस आली.
बांधकाम सुरू असलेल्या नविन घराच्या लोखंडी बारला दोरीचा गळफास लावून चेतनने आत्महत्या केली. कोतवडेकर यांचे जुने घर व बांधकाम सुरू असलेले नवीन घर जवळ-जवळच आहेत. सकाळपासून सर्व कुटुंबीय जुन्या घरीच होते. नवीन घराच्या बांधकामासाठी शनिवारी कामगारही आले नव्हते. घरात कुणीही नसताना नवीन घराच्या दुसऱया माजल्यावर चेतनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
दरम्यान चेतन याचा 4 वर्षाचा पुतण्या नवीन घरात गेला असता त्याला चेतनचा मृतदेह लटकताना दिसला. त्याने लगेचच ही बाब घरातील माणसांना सांगितली. चेतनला तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱयांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसानी पंचनामा, शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.