मानव आणि इतर प्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. मानवाने आपल्या बुद्धिच्या जोरावर संपूर्ण जग व्यापण्याचा चंग बांधला आहे. मानवाची भूकही मोठी असल्याने सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीवर तो हव्यासाने आपला अधिकार सांगतो. त्यामुळे मानवाशी स्पर्धा न करू शकणारे प्राणी धोक्मयात आले आहेत. त्यांचे अधिवास नाहीसे होत आहेत आणि लक्षावधी प्रजाती नष्ट झालेल्या आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थितीतही अनेक मानवांची भूतदया जागृत असून ते वेळप्रसंगी आपला जीव धोक्मयात घालून हिंस्र प्राण्यांचेही संरक्षण करतात. त्यांचे प्रयत्न एकंदर प्रमाणात पाहिले तर अपुरे ठरतात. पण त्यामुळे इतर मानवांसमोर एक आदर्श घालून दिला जातो.
उत्तर प्रदेशात गंगा प्रदेशातील एका जंगलात लांडग्याला पकडण्यासाठी जाळे लावण्यात आले होते. एक लांडगा त्या जाळय़ात सापडलाही होता. मात्र, गावातील एका प्राणीप्रेमीला ही बाब खटकली आणि त्याने त्या लांडग्याला वाचविण्यासाठी आपला जीव धोक्मयात घातला. लांडग्याच्या जवळ जाऊन त्याने ते जाळे फाडून त्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. असा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो. कारण जाळय़ातून सुटलेला लांडगा त्याला सोडविणाऱयावरच हल्ला करून गंभीर जखमी करू शकतो. तथापि, या व्यक्तीने हा धोका पत्करून दाखविलेल्या भूतदयेचे आता कौतुक होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला असून त्याला असंख्य लाईक्स मिळाले आहेत.