सांबरा/ वार्ताहर
बसवन कुडची येथे सोमवार दि. 13 पासून सुरू होणाऱया श्री बसवाण्णा, कलमेश्वर व ब्रह्मदेव यात्रेनिमित्त शनिवारी काकती येथील डोंगरावरून इंगळय़ांची लाकडे आणण्यात आली .
शनिवारी पहाटे बैलगाडे घेऊन काकती येथील डोंगरावर जाऊन ग्रामस्थांनी इंगळ्यांची लाकडे आणली. लाकडे घेऊन येणाऱया बैलगाडय़ांचे ठिकठिकाणी भाविकांनी पूजन करून स्वागत केले. सायंकाळी सातच्या सुमारास बैलगाडय़ा गावांमध्ये पोहोचल्या. आमदार अनिल बेनके यांनी इंगळय़ांची लाकडे आणण्यासाठी गेलेल्या भाविकांना 9 हजार केळी, 7 क्विंटल कुळीथ व 500 कलिंगडचे वाटप केले. गावातील सुमारे 7 हजाराहून अधिक ग्रामस्थ काकती डोंगराला गेले होते. याप्रसंगी आमदार अनिल बेनकेसह नगरसेवक बसवराज मोदगेकर, अप्पूनी चौगुले, परशराम बेडका, भरत भातकांडे, अनिल चौगले व ग्रामस्थ उपस्थित होते.
सोमवारी सकाळी मंदिरात विधिवत पूजा होणार आहे. सायंकाळी चार वाजता ‘हरहर महादेव’ च्या गजरात गुलालाची उधळण करत आंबील गाडय़ांची मिरवणूक निघणार आहे.
मंगळवारी इंगळय़ा कार्यक्रम
मंगळवार दि. 14 रोजी देवाला अभिषेक घालून सायंकाळी 5 वाजता इंगळय़ांचा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी इंगळय़ांच्या कार्यक्रमाला शहर व तालुक्यातील हजारो भाविकांची उपस्थिती असते.
Previous Articleलांडग्याला वाचविण्यासाठी जीव घातला धोक्यात
Next Article जेटीपर्यंत वाहने नेण्यावरून दोनापावला येथे तणाव
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.