प्रतिनिधी/ दहिवडी, म्हसवड
दबंग प्रांताधिकारी म्हणून ओळख असणायां माण-खटावच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी लाकडाची अवैधरीत्या वाहतूक करणायां ट्रकवर कारवाई केली असुन ट्रक लाकडासह जप्त केला असुन यानिमित्ताने माण तालुक्यातील वनविभागाचा कारभार पुन्हा चव्हाटय़ावर आला असुन कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याबाबत माहिती अशी की बुधवार (दि 15) रोजी माण-खटावच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे ह्या ’लॉकडाऊन’ च्या पार्श्वभूमीवर दहिवडी येथील डंगारे पेट्रोल पंपावर तपासणी करत असताना त्यांना ट्रक क्रमांक (एम.एच-11-सी.एच-0496) हा त्यांना ताडपदरी ने पॅक केलेला आढळला मात्र जिरंगे यांना संशय आल्याने त्यांनी ट्रकची तपासणी केली असता ट्रक लाकडाने भरलेला आढळून आला .त्यावेळी ट्रक चालकाकडे कोणताही परवाना नसल्याने त्यांनी त्या ट्रकवर कारवाई करून तो ट्रक प्रथम पोलीसांच्या ताब्यात दिला व त्यानंतर वनविभागाच्या ताब्यात देऊन वनकायद्या नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले. यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असुन भर शहरातुन लाकडाची अवैद्यरित्या वाहतूक होत असताना वनविभागाला याचा साधा सामसुम ही कसा लागत नाही ? दिवसाढवळ्या माण तालुक्यातुन लाकडाची अवैध वृक्षतोड होत असताना वर्षभरात वनविभागाने किती कारवाया केल्या ? विशेष म्हणजे ’लॉकडाऊन’ मध्ये जर लाकडाची वाहतूक होत असेल तर एरवी काय परिस्थिती असेल? तर एखाद्या सजग नागरीकाने