वाई / प्रतिनिधी :
वाई शहरातील राजेशाही हॉटेलमध्ये दोन हजारांची लाच घेताना वाई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार रमेश कोळी मंगळवारी सायंकाळी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले.
याबाबत लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी की, वाई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाईतून मुभा मिळवून देतो, म्हणून तक्रारदरास सहायक पोलीस फौजदार रमेश कोळी याने 4 हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती 2 हजार देण्याचे ठरले. तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपतकडे करताच दि.5 रोजी सायंकाळी वाई पोलीस ठाण्याच्या लगत असलेल्या राजेशाही हॉटेलमध्ये लाचलुचपतच्या पथकाने सापळा लावला अन् कोळी अलगद त्या सापळ्यात अडकला.