थंडीच्या दिवसात उन्हात बसल्याने बरं वाटतं. कोवळं ऊन ‘ड’ जीवनसत्त्वाचा स्रोत आहे हे आपण जाणतोच. दररोज किमान 15 मिनिटं उन्हात बसल्यास शरीराला बर्याच प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व मिळू शकतं. यासोबतच ऊन खाण्याचे इतरही लाभ आहेत. म्हणूनच फक्त थंडीतच नाही तर वर्षभर थोडंफार कोवळं ऊन घ्यायला हवं. कोवळ्या उन्हामुळे होणार्या आरोग्यविषयक लाभांविषयी…
* हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास असेल तर थोडा वेळ उन्हात बसा. कोवळ्या उन्हामुळे मिळणार्या ‘ड’ जीवनसत्त्वामुळे हाडं बळकट होतात. तसंच थंडीमुळे होणारा अंगदुखीचा त्रासही दूर होतो.
* उन्हामुळे शरीरात ‘मेलाटोनिन’ नामक हार्मोनची निर्मिती होऊ लागते. शांत झोपेसाठी या हार्मोनची आवश्यकता असते. तसंच हे हार्मोन्स मानसिक ताणतणाव कमी करण्याचं काम करतात.
* ऊन खाल्ल्याने रक्तातील कोलेस्टरॉलचं प्रमाण घटू शकतं. यामुळे हृदयविकाराला आळा बसू शकतो.
* त्वचेवर संसर्ग झाला असेल तर उन्हात बसा. उन्हामुळे जीवजंतू नष्ट होतील आणि तुम्हाला आराम मिळेल. कोवळ्या उन्हामुळे त्वचेशी संबंधित समस्याही दूर होतात.
* गरोदर महिलांनी उन्हात बसणं आवश्यक आहे. उन्हामुळे पोटातल्या बाळाच्या विकासाला चालना मिळते.
* उन्हामुळे रोगप्रतिकारक क्षमताही वाढते.
* मधुमेह तसंच हृदयविकार असणार्यांनी तर उन्हात बसणं आवश्यक आहे. यामुळे त्यांना बरेच लाभ होतील.