मुंबई : गेल्या काही महिन्यांच्या मंदीनंतर लार्सन अँड टुब्रोच्या समभागांमध्ये एकदम वाढ दिसून आली आहे. गेल्या 2 महिन्यांच्या कालावधीत एल अँड टी च्या समभागांमध्ये 22 टक्के इतकी वाढ झाली आहे. यापूर्वी 7 महिने आधी यावरचा मोबदला 17 टक्के इतका कमी होता. एल अँड टी ही देशातील सर्वात मोठी अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रातील कंपनी मानली जाते. अलीकडच्या काळात या कंपनीला रेल्वेसह इतर कंत्राटे मिळाली आहेत. येणाऱया काळातही याच्या समभागाच्या भावात वाढ होण्याचे संकेत आहेत. कंपनीला अलीकडच्या काळात भरपूर कंत्राटे मिळत असल्याने शेअर बाजारात या कंपनीचे समभाग तेजीचा सूर पकडत आहेत. शिवाय मिळालेली कंत्राटेही कंपनी वेळेवर पूर्ण करत असल्याने अनेकांचा विश्वास मिळवण्याचे कार्य कंपनीने साध्य केले आहे. तिसऱया तिमाहीअखेर 18 डिसेंबरपर्यंत कंपनीकडे 47 हजार कोटींची ऑर्डर होती, असे तज्ञांकडून समजते. मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी दोन मोठी कंत्राटे कंपनीला मिळाली आहेत. पायाभूत विकासाचे कंत्राटही कंपनीकडे आहे. यातही साधारण 15 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Previous Article‘बॉक्सिंग डे’ कसोटी आजपासून
Next Article वनप्लसचा नवा अनोखा 8 टी फोन बाजारात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.