ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईच्या लालबाग परिसरातील साराभाई इमारतीत गॅस बाटलाचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात 20 जण जखमी झाले असून, त्यांना केईएम व ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, साराभाई इमारतीच्या एका खोलीतून मागील काही दिवसांपासून गॅस लीकेजचा वास येत होता. आज सकाळी इमारतीमधील काही नागरिक गॅसचा वास कुठून येतोय हे पाहण्यासाठी गेले असता अचानक स्फोट झाला. या स्फोटातील आगीत 20 जण भाजले असून, त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन बंब आणि दोन मोठे टँकर्स दाखल झाले असून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत होते.