पशुसंगोपन खाते सुस्त; प्रतिबंधक उपाययोजनांचा अभाव : जिल्हय़ात अनेक जनावरांना लागण
प्रतिनिधी /बेळगाव
मागील दोन वर्षांत कोरोना, अतिवृष्टी व शेतीमालाला अयोग्य दर यामुळे शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात सापडला असतानाच गेल्या काही दिवसांपासून जिल्हय़ात लाळय़ा खुरकत संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्याने दुग्ध उत्पादक शेतकऱयांचे अर्थकारण कोलमडले आहे. जिल्हय़ात लाळय़ा खुरकत रोगाचा शिरकाव होऊन झपाटय़ाने फैलाव वाढला आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. याबाबत पशुसंगोपन खाते मात्र सुस्त असल्याने पशुपालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हय़ातील बेळगाव, सौंदत्ती, रामदुर्ग, अथणी, हुक्केरी आणि चिकोडी तालुक्मयांतील जनावरांना लाळय़ा खुरकत रोगाची लागण झाली आहे. मात्र, पशुसंगोपन खात्याकडून प्रतिबंधक लस किंवा वेळेत उपचार मिळत नसल्याने दुग्ध उत्पादकांना खासगी डॉक्टरांकडूनच उपचार करून घ्यावे लागत आहेत. त्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे लाळय़ा खुरकतची लागण झालेल्या जनावरांच्या मालकांची आर्थिक घडी कोलमडली आहे. लाळय़ा खुरकत हा संसर्गजन्य रोग दुभत्या जनावरास झाल्यास दुधावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे पशुपालक संकटात सापडले आहेत.
जिल्हय़ात 28 लाख 9 हजार पाळीव जनावरे आहेत. शिवाय ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून मोठय़ा प्रमाणात गायी-म्हशी पाळल्या जातात. अलीकडे जनावरांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, खात्याकडून वेळोवेळी प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने जनावरांना रोगाची लागण होत आहे. त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम होऊन पशुपालकांना फटका बसत आहे.
पशुसंगोपन खात्यामार्फत दरवषी दोन टप्प्यात लाळय़ा खुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाते. यंदा पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहीम झाली नाही. ऑक्टोबर महिन्यातील दुसऱया टप्प्यातील लसीकरण मोहीमदेखील लांबणीवर पडली आहे. परिणामी जिल्हय़ातील अनेक जनावरांना लाळय़ा खुरकत रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांना खासगी डॉक्टरांकडूनच उपचार करून घ्यावे लागत असल्याने अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.
जिल्हय़ातील अनेक जनावरे लाळय़ा खुरकतची शिकार
लाळय़ा खुरकत या विषाणूजन्य रोगाचा हवेमार्फत फैलाव होतो. त्यामुळे एखाद्या जनावराला लागण झाल्यास इतर जनावरांकडे हा रोग झपाटय़ाने पसरतो. त्यामुळे मागील काही दिवसांत जिल्हय़ात रोगाचा फैलाव वाढला आहे. मात्र, खात्याने प्रतिबंधक लसीकरणाचा पुरवठा नसल्यामुळे लसीकरण मोहीम हाती घेतली नाही. मात्र रोगाचा फैलाव झपाटय़ाने वाढत असल्याने जिल्हय़ातील अनेक जनावरे लाळय़ा खुरकतची शिकार बनत आहेत.
जिल्हय़ात गाय, म्हैस, बैल, शेळय़ा, मेंढय़ा यांची संख्या अधिक आहे. अनेक जनावरांना लाळय़ा खुरकतची लागण झाली आहे. त्यामुळे जनावरांच्या बाजारावरदेखील परिणाम झाला आहे. एखाद्या जनावरास लागण झाल्यास ते जनावर बाजारात किंवा बाहेर सोडणे धोकादायक ठरू शकते. जिल्हय़ात आणखी फैलाव वाढल्यास जनावरांचे बाजारच बंद पडण्याची शक्मयता नाकारता येत नाही.
जनावरांच्या दूध क्षमतेतही घट
मागील 15 दिवसांपासून गावात लाळय़ा खुरकतचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे अनेक जनावरांना रोगाची लागण झाली आहे. खात्याकडून उपचार मिळत नसल्याने खासगी डॉक्टरांना बोलवावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भार सोसावा लागत आहे. त्याचबरोबर जनावरांच्या दूध क्षमतेतही घट झाली आहे.
-मल्लाप्पा पाटील (शेतकरी)
येत्या 15 दिवसांत लसीकरण सुरू होईल
जिल्हय़ात काही तालुक्मयांत लाळय़ा खुरकत फैलावत आहे. मात्र, शासनाकडून अद्याप प्रतिबंधक लसीकरणाचा पुरवठा झाला नाही. येत्या 15 दिवसांत लसीकरण पुरवठा होईल. त्यानंतर तातडीने जिल्हय़ात प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.
-डॉ.अशोक कोळ्ळा (उपनिर्देशक पशुसंगोपन खाते)