वृत्तसंस्था/ मुंबई
मस्कत, ओमान येथे 20 जानेवारीपासून खेळविल्या जाणऱया लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत भारताचा माजी कसोटीवीर सचिन तेंडुलकरचा सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण एसआरटी स्पोर्टस् व्यवस्थापनाने दिले आहे.
या स्पर्धेसंदर्भात अलीकडे प्रसारित करण्यात आलेल्या एका व्हीडिओमध्ये सुपरस्टार अभिनेते अभिताभ बच्चन यांनी सचिन तेंडुलकरचा स्पर्धेत सहभाग राहील, असे सुचित केले होते. पण सचिन खेळणार नसल्याचे एसआरटी स्पोर्टस् व्यवस्थापनाने खुलासा केला.
सदर स्पर्धेमध्ये भाग घेणाऱया इंडिया महाराजा संघामध्ये माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि स्टुअर्ट बिन्नी यांचा समावेश करण्यात आला आहे. भारताचे माजी प्रमुख प्रशिक्षक आणि अष्टपैलू कर्णधार रवि शास्त्राr हे या स्पर्धेचे प्रमुख आयुक्त असतील. सदर स्पर्धेत भारत, पाक, लंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या देशांचे माजी क्रिकेटपटू सहभागी होत आहेत. या स्पर्धेत एकूण तीन संघांचा समावेश राहील.