ऑनलाईन टीम / नगर :
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) एमबीटी अर्जुन टँकमधून लेझर गाइडेड टँकविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. अहमदनगर येथील केके रेंजमध्ये ही चाचणी घेण्यात आली.
डीआरडीओने म्हटले आहे की, हे क्षेपणास्त्र तीन किलोमीटरपर्यंत टार्गेटला लक्ष्य करू शकते. अनेक प्लॅटफॉर्म प्रक्षेपण क्षमतांसह हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. सध्या एमबीटी अर्जुनमध्ये बसवलेल्या बंदुकीद्वारे त्याचे तांत्रिकदृष्ट्या मूल्यमापन केले जात आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी ट्विटरवरून डीआरडीओचे अभिनंदन केले. ‘भविष्यात आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या टीम डीआरडीओचा भारताला अभिमान आहे,’ असे सिंह यांनी म्हटले आहे.