वृत्तसंस्था / लेह
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विशेष भेटवस्तू प्राप्त करणाऱयांच्या यादीत लक्षद्वीपनंतर लेहचे नाव देखील सामील झाले आहे. तेथे ‘खादी’ने तयार करण्यात आलेला जगातील सर्वात मोठय़ा राष्ट्रीय ध्वजाचे अनावरण करण्यात आले आहे. देशभरात शनिवारी गांधी जयंती साजरी करण्यात आली आहे. खादीच्या वापराबद्दल गांधीजी आग्रही होते.
लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर.के. माथूर यांनी शनिवारी केंद्रशासित प्रदेशात खादीने तयार करण्यात आलेल्या तिरंग्याचे आरोहण केले आहे. हा राष्ट्रीय ध्वज 225 फूट लांब आणि 150 फूट रुंदीचा आहे. हा ध्वज 1 हजार किलो वजनी असल्याचे सांगण्यात येते. दोन दिवसांच्या लडाख दौऱयावर पोहोचलेले सैन्यप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांच्यासाब्sात अनेक वरिष्ठ सैन्याधिकारी देखील उपस्थित होते.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी हा भारतासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. गांधी जयंतीवेळी जगातील सर्वात मोठय़ा खादीच्या तिरंग्याचे अनावरण लेहमध्ये झाल्याचे त्यांनी ट्विट करत नमूद पेले आहे. हा तिरंगा खादी विकास महामंडळ आणि मुंबईतील एका प्रिटिंग पेस कंपनीने मिळून तयार केला आहे. 8 ऑक्टोबर रोजी हा ध्वज हिंडन वायुतळावर नेण्यात येणार आहे.
इंजिनियर रेजिमेंटच्या 150 सैनिकांनी स्वतःच्या खांद्यावर तिरंगा घेत तो 2 हजार फुटांच्या उंचीवर नेला होता. सैनिकांना शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी 2 तास लागले असून या पूर्ण मोहिमेची चित्रफित समोर आली आहे.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी लक्षद्वीपमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाचे अनावरण केले आहे. लक्षद्वीपमधील गांधींचा हा पहिलाच पुतळा ठरला आहे.