बेंगळूर/प्रतिनिधी
तमिळ चित्रपट अभिनेता विजयच्या ‘मास्टर’ चित्रपटाच्या यशानंतर सँडलवुडमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १००- शो हाऊसफुल झाले. आता चंसँडलवुडनेदेखील थिएटरमध्ये १०० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. कर्नाटकातील १०० पेक्षा जास्त केंद्रांवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
दरम्यान लोकेश कनागराज दिग्दर्शित ‘मास्टर’ या दाक्षिणात्य चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. करोना काळातही एवढी कमाई करणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे.
पहिल्या दिवशी २ लाख ५० हजार प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिल्याचे सांगण्यात येत आहे. कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स (केएफसीसी) चे अध्यक्ष जयराम यांनी सध्याच्या राज्य सरकारने सिनेमागृहांना ५० टक्के दर्शकांना प्रवेशास परवानगी दिली आहे. सँडलवुडच्या प्रसिद्ध कलाकारांचे ८-१० चित्रपट अद्याप प्रदर्शित होणार नाहीत, इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूकीसह चित्रपटांची निर्मिती केली असून चित्रपटाच्या निर्मात्यांचे नुकसान झाले आहे.