कोणतीही सूट देता येणार नाही – पालकमंत्र्यांचे स्पष्टिकरण
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी
टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनचे पालन केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे सुरू आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सूट देण्यात येणार नसल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या जुन्या सभागृहामध्ये पालकमंत्र्यांनी जिल्हय़ातील व्यापाऱयांशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते आदी उपस्थित होते.
प्रशासन व पोलीस यांच्यामध्ये चांगला समन्वय असून ते व्यापाऱयांना चांगले सहकार्य करत असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, 3 मेनंतर टाळेबंदीबाबत नवीन नियम येणार आहेत. यंत्रणेवरही कोरोना टाळेबंदीची अंमलबजावणी करताना दबाव आहे. सध्या जिल्हय़ाची वाटचाल ग्रीन झोनकडे सुरू आहे. व्यापाऱयांनी या काळात प्रशासन व पोलीस यांना सहकार्य करावे. लघु उद्योगातील कामगारांना पास देण्याविषयी विचार करू. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱया सर्व गाडय़ा एकाच वेळी येणार नाहीत, याची दक्षता व्यापाऱयांनी घ्यावी. लाकूड व फळांच्या वाहतुकीस जिल्हय़ामध्ये परवानगी असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
ज्ये÷ नागरिकांना रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षास परवानगी
ग्रामीण भागामध्ये अनेकवेळा रिक्षाचालक ज्ये÷ नागरिकांना रुग्णालयात नेणे व त्यांचे किराणा सामान आणण्याचे काम करतात. त्यांना परवानगी मिळावी, अशी मागणी रिक्षा चालक मालक संघटनेच्यावतीने करण्यात आली. त्यावर बोलताना पालकमंत्र्यांनी रिक्षा चालकांनी ज्ये÷ नागरिकांची व रुग्णांची वाहतूक करावी. पण त्यावेळी डॉक्टरांचे सर्टिफिकेट व कागदपत्रं सोबत ठेवावीत. रुग्ण वाहतूक करणाऱया रिक्षांना त्रास होणार नाही, याची पोलिसांनी काळजी घ्यावी, असे सांगितले. तसेच गाव पातळीवर ग्रामपंचायतीने एक रिक्षा रोज अधिग्रहित करून ठेवावी. त्याचा वापर ग्रामीण भागातील लोकांना सिलिंडर, रेशन यांची वाहतूक करण्यासाठी होईल. ही रिक्षा रोटेशन पद्धतीने रोज एक अधिग्रहित करावी. यामुळे रिक्षा चालकांना थोडाफार रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. 3″:{“supports_spdy”:true}},{“loadm.exelator.com:443”:{“supports_spdy”:true