मार्गदर्शनाबरोबरच मनोरंजनाच्या कार्यक्रमांतून बक्षिसांची लयलूट होणार
प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य सोसायटी आयोजित ‘उन्नती 2020 एक पाऊल प्रगतीकडे’ या महिलांसाठीच्या तिळगूळ समारंभाचे उद्घाटन आज होत आहे. या कार्यक्रमाची उत्सुकता महिलावर्गामध्ये शिगेला पोहोचली आहे. बौद्धिक मार्गदर्शनाबरोबरच मनोरंजनाच्या कार्यक्रमात विजेत्यांना दिल्या जाणाऱया बक्षिसांची उत्सुकताही तितकीच आहे. महिलांच्या अपेक्षेला उतरणाराच हा कार्यक्रम ठरणार आहे.
हजारो महिलांना उद्योजकतेकडे वळविलेल्या कांचन परुळेकर यांच्या मार्गदर्शनाने बेळगावमधल्या महिलाही स्वावलंबी झालेल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक भाषणातून महिलांना नेहमीच प्रेरणा मिळाली आहे. शर्मि÷ा राऊत या आजच्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत. झगमगाटाच्या दुनियेत राहणे वलयांकीत असले तरी हे क्षेत्रसुद्धा आपल्याकडून अपार मेहनतीची अपेक्षा करते, हे सांगणारा त्यांचा प्रवास महिलांना उद्बोधक करणारा ठरेल.
उन्नती गृहलक्ष्मी निवडीसाठीच्या स्पर्धा महिलांचे निखळ मनोरंजन करतानाच त्यांना व्यासपीठ निर्माण करून देणारे आहे. एक मिनिटाच्या स्पर्धा असल्या तरी त्यातही बौद्धिक कस लागणार आहे. अंतिम फेरीतील 10 स्पर्धकांमधून पहिल्या 3 विजेत्यांची निवड करण्यात येणार असली तरी या फेरीतील सर्वच स्पर्धक महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय विविध बक्षिसांची लयलूट होणार आहे.
कार्यक्रम नियोजित वेळेतच सुरू होणार आहे. चहापान करून महिलांनी आपले वाण घेऊन वेळेवर आसनस्थ होणे आवश्यक आहे. निराशा टाळण्यासाठी आणि कार्यक्रम सुनियोजितपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी वेळेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन लोकमान्य सोसायटीने केले आहे.
लकी ड्रॉ विजेत्या महिलेला ‘सोन्याची नथ’ देण्यात येणार आहे. याशिवाय अनेक बक्षिसे आहेत. मात्र सर्वांनाच संधी मिळावी, या हेतूने गटागटाने किंवा विभागवार स्पर्धा होतील. गतवषी झालेली गर्दी लक्षात घेऊन यंदा सर्वच महिलांना कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा, यासाठी भव्य स्क्रिन बसविण्यात आला आहे.
महत्त्वाच्या सूचना…
- सर्व महिलांनी प्रवेशद्वाराजवळ आपल्या नावाची नोंद करणे आवश्यक आहे. लकी ड्रॉ, अन्य बक्षिसांच्या दृष्टीने ही नोंदणी महत्त्वाची आहे.
- 45 वा. पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत केले जाईल.
- 4 वा. कार्यक्रमाला सुरुवात होईल.
- लोकमान्य सोसायटीतर्फे प्रारंभी चहापान असेल.
- मध्यंतरानंतर महिलांच्या सोयीसाठी हॉटेल बगिचातर्फे स्टॉल उभारण्यात येणार आहे. तेथे मात्र शुल्क देऊन महिलांना पदार्थ घेता येतील.
- त्याचबरोबर आपल्या सोबत येताना पाण्याची बाटली घेऊन यावी.