प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने गुरुवारी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली. सैनिकांना आरोग्यसेवा लवकर उपलब्ध व्हावी, यासाठी रुग्णवाहिका देण्यात आली आहे. लोकमान्यने सामाजिक हेतूने मराठा लाईट इन्फंट्रीला रुग्णवाहिका दिली. मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडिंग ऑफिसर ब्रिगेडिअर रोहित चौधरी (सेना मेडल) यांच्या हस्ते रुग्णवाहिकेला चालना दिली.
लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या संकल्पनेतून यापूर्वीच मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये म्युझियम उभारण्यात आले आहे. लोकमान्य परिवाराने यापुढे जात देशसेवा करणाऱया जवानांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. गुरुवारी लोकमान्य सोसायटीचे संस्थापक चेअरमन किरण ठाकुर यांनी रुग्णवाहिकेची चावी कमांडिंग ऑफिसर रोहित चौधरी यांच्याकडे सुपूर्द केली. रोहित चौधरी यांनी लोकमान्यच्या या कार्याचे कौतुक केले.
यावेळी लोकमान्यचे संचालक अजित गरगट्टी, पंढरी परब, सुबोध गावडे, गजानन धामणेकर, समन्वयक विनायक जाधव, माणिकबाग
ऑटोमोबाईलचे रमेश शहा, डेप्युटी कमांडर कर्नल स्वप्निल त्रिभुवन, लेफ्टनंट कर्नल निखिल डिकोडा, मेजर जसविंदर सिंग, सुभेदार मेजर सलीम एस. व लोकमान्य परिवारातील सदस्य उपस्थित होते.