प्रतिनिधी/ बेळगाव
वडगाव बाजार गल्ली येथील गणपती-हनुमान मंदिरामध्ये अधिक मासानिमित्ताने शनिवारी पहाटे 5 ते 7 या वेळेमध्ये अष्टगंध पूजनाचा कार्यक्रम मंदिराचे मुख्य अर्चक बद्रीनाथ कुलकर्णी यांनी हरी सर्वोत्तम वायुज्योत पवमानच्या व गणेश अर्थवशीर्षपासून रुद्राभिषेक, दुर्वा अलंकार पूजा, पान पूजा, सिंदूर पूजा, कुंकुम पूजा, लोणी पूजा, बुत्ती पूजा, तेल पूजा, गणेश अथर्व स्त्राsतपासून ते संकटमोचन हनुमानष्टक या आष्टगंध पूजा झाल्यानंतर हनुमानला रूईच्या पानावर ‘श्री शिवषडक्षर स्त्राsत लिहिलेला हार अर्पण करून कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी गाऱहाणे घातले. यावेळी देवस्थान कमिटीचे सदस्य यल्लाप्पा पाटील, राजू कुबसत, सुरेश पिळणकर, संजय मुतालिक, हभप वैजनाथ उचुकर व भाविकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.