मुंबई
चीनमधील वनप्लस या कंपनीकडून जुलैमध्ये स्मार्ट टीव्ही व स्मार्ट फोन तोही परवडणाऱया किंमतीत भारतात सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वनप्लसचा स्मार्ट टीव्ही 2 जुलैला तर परवडणारा स्मार्टफोन झेड वनप्लस 10 जुलैला भारतात लाँच होणार आहे. स्मार्टफोनबाबत मात्र कंपनीने कोणतीही माहिती उघड केलेली नाही. नवा फोन 5 जी तंत्रज्ञान असलेला असेल. वनप्लस 8 प्रो व 8 याप्रमाणे हा फोन आहे असंही सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे याबाबत ग्राहकांमध्ये आता उत्सुकता वाढली असून बाजारात दाखल होण्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.