सागरिका म्युझिक , वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर या त्यांच्या घरच्या कलाकारांच्या सुरेख गाण्यासह आपल्या लव्ह सॉंग फेस्टिव्हलचा ग्रँड फिनाले सादर करीत आहेत. निलेश मोहरीर यांनी वाटेवरी मोगरा या गाण्याची सुंदर रचना केली आहे. सागरिका म्युझिक सोबतच निलेशने आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. श्रीपाद जोशी या आगामी प्रतिभावान गीतकाराने या गाण्याचे शब्द लिहिले आहेत.
वैशाली आणि स्वप्नीलने सागरिका म्युझिकसाठी आतापर्यंत 100 हुन अधिक गाणं गायिली आहेत आणि त्यात हे गाणं पहिल्या 10 मध्ये नक्कीच येईल. गाण्याचा ऑडिओ जर घरच्याच कलाकारांसोबाबत असेल तर व्हिडिओच्या बाबतीतही काही वेगळं नाही. या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन सागरिका दास यांनी केले आहे (ज्यांनी 50 हुन अधिक म्युझिक व्हिडिओंचे दिग्दर्शन केले आहे ज्यात हळू हळू चाल , सावली उन्हामध्ये , मस्त चाललंय आमचं, राधा राधा या सारख्या व्हिडिओजचा समावेश आहे) मानसी नाईक जी एक घरचीच कलाकार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सागरीकाच्या अनेक व्हिडिओज मध्ये झळकलेली मानसी नाईक आता पूर्णपणे नवीन अवतारात वाटेवरी मोगरामध्ये दिसणार आहे. मानसी नाईकचा आत्तापर्यंतचा हा पहिलाच रोमँटिक म्युझिक व्हिडिओ आहे. नवीनच लग्न झालेल्या मानसीसोबत तिचा नवरा प्रदीप खरेरा यात तिच्यासोबत असल्यामुळेच हा म्युझिक विडिओ अजूनच खास झाला आहे. यावर्षी 19 जानेवारीला मानसीने प्रदीप खरेरा (आंतरराष्ट्रीय बॉक्सर आणि अभिनेता) यांच्याशी लग्न केले आणि या म्युझिक व्हिडिओतून ते पहिल्यांदाच एकत्रित दिसणार आहेत.