मंत्री उदय सामंत यानी जागवल्या लता दिदींच्या आठवणी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
Qभारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधनाचे वृत्त समजताच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी लता मंगेशकर यांच्या आठवणी जाग्या केल्य़ा शासकीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासंदर्भात मंत्री सामंत यांचे लता मंगेशकर यांच्याशी बोलणे झाले होत़े तसेच सामंत याच्या 45 व्या वाढदिवसाच्या दिवशीही लता मंगेशकर यांनी शुभेच्छा दिल्या होत्य़ा हीच आपल्या आयुष्यातील शिदोरी असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
राज्य शासनाच्यावतीने मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होत़ा याची माहिती देण्यासाठी मंत्री सामंत यानी लता मंगेशकर यांच्याशी चर्चा केली होत़ी यावेळी लता मंगेशकर यांनी संगीत महाविद्यालय येथे शास्त्राrय संगीत, लोकसंगीत, नृत्य, पाश्चिमात्य संगीत आदींचा समावेश करावा, अशी सूचना केली होत़ी तसेच ओल्ड हाऊसही स्थापन करावे, असे मंगेशकर यांनी सामंत यांना सांगितले होत़े दरम्यान कोरोना काळ संपल्यानंतर आपण स्वतः दिदी तुम्हांला भेटून या महाविद्यालयासंदर्भात सविस्तर चर्चा करणार असल्याचे आश्वासन सामंत यांनी दिले होत़े तसेच मंत्री सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा लता मंगेशकर यांनी दिल्या होत्य़ा