पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही दिल्या जवानास वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रतिनिधी / सातारा
कोरोना विषाणूच्या विरोधात सर्वांनीच लढा पुकारला आहे. हे तिसरे महायुद्धच असावे लागेल. या लढाईत महत्वाचा वाटा उचलत आहेत ते पोलीस जवान. सातारा पोलीस तर जीवाचे रान करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उभे आहेत. बंदोबस्ताचा किती ही ताण असला तरीही देशावर आलेले संकट दूर करण्यासाठी पोलीस जवान खडे आहेत. सातारा पोलीस दलात वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलीस जवान विनायक मानवी हे त्यापैकी एक. आज त्यांचा वाढदिवस असूनही त्यांनी सुट्टी न घेता ऑन डय़ुटी होते. पहाटे शहरात मॉर्निंग पथकात त्यांनी घरात न बसता फिरायला आलेल्याना घरी पिटाळून लावले.
सातारा पोलीस दलात कार्यरत असलेले विनायक मानवी हे मूळचे सोलापूर जिह्यातील. आज त्यांचा वाढदिवस आहे. सातारा पोलीस दलातल्या जवानांना वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी दिली जाते. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडून शुभेच्छाही ज्या कोणाचा वाढदिवस असेल त्यास दिल्या जातात. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे पोलीस जवान विनायक मानवी यांनी सुट्टी न घेता सकाळपासून ते ऑनडय़ुटी होते.