शेळ मेळावली आयआयटी विरोधकांना सताविण्याचा प्रयत्न केल्यास मुख्यमंत्री निवासस्थानी धरणे धरणार
वाळपई प्रतिनिधी
गोवा सरकारतर्फे गुळेली पंचायत क्षेत्रातील शेळ मेळावली याठिकाणी उभारण्यात येणार असलेल्या आयआयटी प्रकल्पातून सरकार सुडाचे राजकारण करत आहे .याप्रकल्पाला विरोध करणाऱया शेळ मेळावली येथील नागरिकांना ?गवेगळय़ा मार्गाने त्रास देण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. नुकत्याच झालेल्या आंदोलनाच्या पार्श्?वभूमीवर नागरिकांना पोलिसांकडून नोटिसा बजावून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून गोवा सरकार करीत आहे. यामागे स्थानिक आमदार विश्वजीत राणे यांचा हात आहे. गोवा राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे जबाबदारी आहे.
यानागरिकांना त्रास देण्याचे षडयंत्र मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तयार करीत आहे की यामागे विश्?वजित राणे यांचा हात आहे याचे स्पष्टीकरण गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी ताबडतोब द्यावे .त्याचप्रमाणे याभागातील नागरिकांना आणखीन नोटिसा पाठवून त्यांना वाळपई पोलीस स्थानकावर बोलावण्याचा प्रयत्न केल्यास मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या साखळी येथील निवासस्थानी वाळपई काँग्रेस गटसमितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेळ मेळावली येथील नागरिक धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा वाळपई काँग्रेस कमिटीच्यावतीने देण्यात आलेला आहे.
वाळपई काँग्रेस समितीच्यावतीने आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. यापत्रकार परिषदेत शेळ मेळावली येथील चार जणांना नोटिसा पाठवून त्यांना पोलीस स्थानकावर बोलावण्याच्या कृतीचा गट समितीने तीव्र शब्दात निषेध केला आहे. स्थानिक आमदार नागरिकांसमोर दादागिरी करीत आहे. पोलिसांचा गैरवापर करून याप्रकल्पविरोधी आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र ते कदापि शक्मय होणार नाही. सनदशीर मार्गाने याप्रकल्पाला विरोध करण्यासाठी रविवारी घेण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या सक्रिय कार्यकर्त्यांना दबावाखाली ठेवण्याच्या उद्देशाने सरकार पोलीस खात्याचा धाक दाखवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी समितीचे अध्यक्ष दशरथ मांदेकर यांनी यावेळी केला.
यापूर्वी काँग्रेस पक्षाने याआंदोलनाला बाहेरून पाठिंबा दिला होता .आता गरज पडल्यास ह्या आंदोलनाचे नेतृत्व करण्याचा इशारा समितीने दिलेला आहे. आतापर्यंत या नागरिकांना पाठविण्यात आलेल्या नोटिसा सरकारने त्वरित मागे घ्याव्यात त्याचप्रमाणे इतर नागरिकांना नोटिसा पाठविण्याचा प्रयत्न केल्यास मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या साखळी येथे निवासस्थानासमोर धरणे कार्यक्रम धरण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे याप्रकल्पाच्या जागी असलेली जैवविविधता धोक्मयात असून यासंदर्भात गोवा राज्याचे पर्यावरण मंत्री केंद्रीय पर्यावरण मंत्री यांना निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. याआंदोलनकर्त्यावर अन्याय केल्यास वाळपई काँग्रेस गट समिती गप्प बसणार नसून गरज पडल्यास याप्रकल्पाच्या विरोधात गोवा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे दशरथ मांदेकथ यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या समवेत वाळपई काँग्रेस गट समितीचे सरचिटणीस नंदकुमार कोपर्डेकर समितीचे उपाध्यक्ष सुरेश कोंदाळकर काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष रमेश पळशेकर यांची उपस्थिती होती.