प्रतिनिधी / वास्को
वास्कोतील प्रसिध्द उद्योजक तथा माजी आमदार स्व. वसंतराव जोशी यांचे कनिष्ठ पुत्र पुष्कर जोशी(62) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. संध्याकाळी वास्कोतील खारवीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतीम संस्कार करण्यात आले. पुष्कर जोशी हे उद्योजक परेश, प्रशांत, पराग व पंकज यांचे कनिष्ठ बंधु होते. त्यांच्या पश्चात दोन भगिनीही आहेत. त्या अमेरीकेत असतात. पत्नी डॉ. मोनिका या नौदलाच्या सेवेत आहेत. त्यांना पुत्र व कन्या अशी दोन मुले आहेत. पुष्कर जोशी हे जोशी कुटुंबियांचा ऑटो सविर्सीस हा पारंपरीक व्यवसाय हाताळीत होते. हौस म्हणून ते कृषी व्यवसायही करायचे. हल्ली त्यांची प्रकृती बिघडली होती. नुकतीच त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र तरीही त्यांची प्रकृती खालावली व बुधवारी सकाळी त्यांना मृत्यू आला. पुष्कर जोशी हे सुस्वभावी व मनमिळावू तसेच शांत वृतीचे होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने वास्कोतील सामाजीक, उद्योग, कला, शैक्षणिक व इतर विविध क्षेत्रातील मित्र मंडळी व नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.